जळगाव : आपल्याला लग्नाचे वचन देत असतानाच दुसऱ्या प्रियकरासोबत फिरणाºया प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी तिच्या समक्षच खान्देश सेंट्रलच्या तिसºया मजल्यावर चढून ‘शोले स्टाईल’ आत्महत्येचा प्रयत्न करणाºया तरुणाला पोलीस व आपत्कालिन यंत्रणेने आपल्या कौशल्याने ताब्यात घेत त्याचा जीव वाचविला. गणेश श्रीकृष्ण पवार (वय २३, रा.धर्मापुर, ता.नांदगाव खांडेश्वर जि.अमरावती) असे प्रेमवीर तरुणाचे नाव आहे. दरम्यान, गणेश याने तब्बल एक तास यंत्रणेला वेठीस धरले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खान्देश सेंट्रल येथेच कामाला असलेली मनिषा सोबत (नाव बदलले आहे) गणेश याचे चार वर्षापासून प्रेमप्रकरण होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. गणेश हा बडनेरा येथे पेट्रोल पंपावर कामाला आहे. दुसरीकडे त्याच्या मनिषाचे खान्देश सेंट्रलमध्येच कामाला असलेल्या तरुणासोबत सूत जुळले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गणेश याने मनिषाला जाब विचारला. त्याने झाला प्रकार मान्य करुन मी तुझ्यासोबतच लग्न करणार असे गणेशला सांगितले. लग्न माझ्याशी, प्रेमप्रकरण दुसºयाशी असे म्हणत गणेश याचे मनिषाशी खटके उडायला लागले होते. तुला असेच करायचे होते, तर माझे चार वर्ष वाया का घालवले असा संताप गणेश याने केला. त्यावेळी मनिषा हिने सर्व मित्र, मैत्रिणींसोबत शिवराळ भाषा वापरुन अपमानित केले. त्यामुळे संतापात गणेश हा थेट तिसºया मजल्यावर गेला अन् तेथून उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. गणेश याच्यामागे मनिषा, तिचा प्रियकर व अन्य मित्र, मैत्रीणही धावले. पोलीस, मनपाच्या आपत्कालिन विभागाचे कर्मचारी सर्व साहित्यासह दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्नानंतर गणेश याला खाली उतरविण्यात आले. तेथून त्याला शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे त्याची प्रेयसी, तिचा दुसरा प्रियकर या दोघांना बोलावण्यात आले.
जळगावात विरुगिरी : प्रेमभंग झालेल्या तरुणाचा ‘शोले स्टाईल’ आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:50 IST
तरुणाला पोलीस व आपत्कालिन यंत्रणेने आपल्या कौशल्याने ताब्यात घेत त्याचा जीव वाचविला
जळगावात विरुगिरी : प्रेमभंग झालेल्या तरुणाचा ‘शोले स्टाईल’ आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देतब्बल एक तास यंत्रणेला धरले वेठीसप्रेयसी, तिचा दुसरा प्रियकर या दोघांना बोलावण्यात आल