शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथील विवाहितेवर दोघांकडून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:35 IST

अपहरण करून नेले जंगलात : पिंपळगाव हरेश्वर येथून सुटका

पहूर, ता.जामनेर : येथील पाचोरा रोडलगत असलेल्या खडीमशीन या नवीन वसाहतीमध्ये राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजातील २० वर्षीय विवाहितेचे गुरुवारी सकाळी दोघांनी भरदिवसा अपहरण करून जंगलात नेऊन अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून पीडितेची रात्री सुटका केली असून याप्रकरणी पहूर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पाचोरा रोडवरील वीज उपकेंद्रासमोर खडीमशीन नवीन वसाहतीत भिक्षा मागून पोटभरणारे आदिवासी पारधी समाजाची काही कुटुंबे आहेत. यातील मोनाली (नाव बदललेले) ही २० वर्षीय विवाहिता दोन लहान भावडांसह पहूर गावात भिक्षा मागण्यासाठी सकाळी सात वाजता घराबाहेर पडली. भिक्षा आटोपल्यावर ती घराकडे साडेआठच्या सुमारास परतली. यादरम्यान पाचोरा रोडवर मागून रिक्षात आलेल्या गौरव राजू कुमावत रा.खडी मशीन व भिका फकिरा तडवी रा.सांगवी या दोघांनी तिला रिक्षात ओढले व मारहाण केली. त्या दोघांनी तिचे तोंड व हातपाय बाधले. रिक्षाचालक कैलास घोंगडे याला चाकूचा धाक दाखवून आम्ही सांगतो तिकडे चल म्हणून वाकोदजवळील एका पेट्रोलपंपावर रिक्षा थांबविली. त्या ठिकाणी हुसेन जबीर तडवी रा.खडी मशीन हा दुचाकी घेऊन आला. मात्र प्रकरण वेगळेच असल्याचा संशय कैलास व हुसेन यांना आल्याने त्यांनी वाकोद येथून माघार घेतली. तेथून भिका व गौरव यांनी दुचाकीवर मोनालीला भारूडखेड्याच्या जंगलात नेऊन तिच्यावर एका झोपडीत सामूहिक अत्याचार केला.

लहान मुलांकडून घटना उघडकीसमोनालीसोबत असलेल्या दोन लहान मुलांनी तिला पळविल्याचे घरी सांगितल्यावर तिचा शोध घेण्यात आला. गुरवारी दुपारी दोन वाजेनंतर दोन पोलीस व मोनालीचे काका यांनी पाचोरा येथे जाऊन शोध घेतला. मात्र तपास लागला नाही. घटनेने नातेवाईक सैरभैर झाले होते.पिंपळगाव हरेश्वर येथून रात्री सुटकामोनाली ही अत्याचार करून हातपाय व तोंड बांधलेल्या अवस्थेत पिंपळगाव येथील काही महिलांना दिसली. त्यांनी विचारपूस करून तिची सुटका केली. तिच्या काकांचा माबाईल नंबर घेऊन महिलांनी संपर्क साधला असता नातेवाईकांनी तिला ताब्यात घेऊन गुरुवारी रात्री दहा वाजता पहूर येथील घरी आणले. पीडितेने संपूर्ण प्रकार घरी सांगितला. शुक्रवारी सकाळी याबाबत पहूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.पोलीसांकडून दोघांविरुद्ध कारवाईपीडितेच्या फिर्यादीवरून गौरव राजू कुमावत (रा.खडी मशीन, पहूर) व भिका फकीरा तडवी (रा.सांगवी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत.