अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 19:00 IST2019-06-23T19:00:16+5:302019-06-23T19:00:48+5:30

कापूसवाडी येथील चौघांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Atrocities on minor girls | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार




जामनेर : बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पपवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार करणाऱ्या कापूसवाडी येथील चौघांवर पोस्को कायद्यांतर्गत शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहिती नुसार, अल्पवयीन मुलीस अर्जुन रामदास नवघरे याने १६ जूनला पळवून नेले. तिच्यावर शेगाव व पुणे येथे अत्याचार केले. याकामी त्याला गजानन भिमराव इंगळे, नितीन दीपचंद राठोड व पवन शेशराव इंगळे (रा. कासूसवाडी) यांनी मदत केली. चौघांविरुध्द भादंवि कलम ३६३, ३७६, पोस्को कायदा कलम ३, ४, ७ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सुनील कदम तपास करीत आहेत.

Web Title: Atrocities on minor girls