हिरापूर येथे शेतकरी संघटनेचे रोहित्रासाठी आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 16:00 IST2021-01-23T15:59:20+5:302021-01-23T16:00:23+5:30
हिरापूर (ता. पारोळा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रोहित्र मिळावे, या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

हिरापूर येथे शेतकरी संघटनेचे रोहित्रासाठी आत्मक्लेश आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : जळगाव जिल्ह्यातील हिरापूर (ता. पारोळा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रोहित्र मिळावे, या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
रोहित्र जळून जवळजवळ दहा दिवस झाले. शेतकऱ्यांनी तोंडी व निवेदन देऊन मागणी केली. तरी शेतकऱ्यांना रोहित्र मिळत नाही. रोहित्राची मागणी केल्यावर आधी ८० टक्के बिल भरा, तरच रोहित्र मिळेल, असे उत्तर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे दि. २३ रोजी सकाळी १० वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत हिरापूर येथील रोहित्राजवळ आत्मक्लेश आंदोलन केले.
यावेळी विठोबा पाटील, मोतीलाल पाटील, जितेंद्र पाटील, भैय्या पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाखा अभियंता निसार तडवी यांनी दोन दिवसांत रोहित्र मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.