शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

जळगावात ३ हजार गणेश भक्तांचे अथर्वशीर्ष पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 3:13 PM

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत सुमारे ३ हजार गणेश भक्तांनी विश्व कल्याणासाठी रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत अथर्वशीर्ष पठण केले.

ठळक मुद्देसुभाष चौक मित्र मंडळाचा उपक्रम५० हजार सामूहिक आवर्तनांनी परिसर भक्तिमयगणपती पूजन, ओंकार ध्वनी, शंखनाद शांतीपाठाद्वारे अथर्वशीर्षाला सुरुवात

जळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत सुमारे ३ हजार गणेश भक्तांनी विश्व कल्याणासाठी रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत अथर्वशीर्ष पठण केले.ओंकार ध्वनी, शंखनाद व ५० हजारांपेक्षा अधिक सामूहिक आवर्तनाने सुभाष चौक परिसर मंगलमय झाला होता़ निमित्त होते सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था व स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अथर्वशीर्ष पठणाचे.भव्य अशा मंडपात भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख आचार्य पंडित महेशकुमार त्रिपाठी आणि स्वामी समर्थ केंद्राचे जिल्हाप्रमुख विजय निकम यांनी अथर्वशीर्षाचे माहात्म्य सांगितले.श्री गणेश विद्येची देवता असून पहिली ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांनी गणेशाची आराधना करावी, गणपतीच्या कृपेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागते तसेच सुसंस्कारित भावी पिढी निर्माण होते, असे ते म्हणाले़यानंतर गणपती पूजन, ओंकार ध्वनी, शंखनाद शांतीपाठाद्वारे अथर्वशीर्षाला सुरुवात झाली़यावेळी गणपतीवर दुग्धाभिषेक अनंत कासार दाम्पत्य, तर दुर्वाभिषेक पूनम अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले़ सूत्रसंचालन संजय गांधी, तर आभार विजय जगताप यांनी मानले़अथर्वशीर्ष पठणाच्या या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीकांत खटोड, मनीष अग्रवाल, प्रवीण बांगर, संजय पांडे, भरतकुमार शहा, गोपाल पाटील, अलोक अग्रवाल, अक्षय खटोड, नरेंद्र कापडणे, महेश दायमा, मयूर कासार, महेश गोला, सिद्धार्थ दाधिच, सचिन शर्मा, अमित कासार, पंकज गव्हाळे, प्रमोद भामरे, पराग सरोदे, रवींद्र बारी, संतोष जगताप, अनिल नारखेडे, मयूर जाधव, दत्तू विसपुते, आकाश भक्कड यांच्यासह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवJalgaonजळगाव