जळगाव : अमृत योजनेची कामे आता पूर्णत्वाकडे आली आहेत. गणेश कॉलनीमध्ये दीड ते दोन वर्षे आधी चरी खोदण्यात आल्या. त्यानंतर त्यांवर माती टाकून त्या बुजवल्या. मात्र नंतर त्यावर फक्त खडी टाकून रस्ता सपाट करण्यात आला आहे. त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. खडी आता डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर देखील पसरत आहे.
नाभिक व परीट समाजाला व्यवसायाची परवानगी द्या
जळगाव : नाभिक आणि परीट समाजातील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी शासनाने मुभा द्यावी, अशी मागणी आरपीआयचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या संकटात दैनंदिन व्यवसाय करून पोट भरणाऱ्यांना अडचणींना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्या, असे या निवेदनात म्हटले आहे.