आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व प्रलंबित मागण्यांसाठी पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:11+5:302021-09-10T04:22:11+5:30
वारंवार उशिराने होत असलेले वेतन, जिल्हा परिषदेच्या स्थानिक कार्यालयातून बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरण, उशिराने निवृत्तिवेतन मिळणे, कामाचा ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व प्रलंबित मागण्यांसाठी पालकमंत्र्यांना साकडे
वारंवार उशिराने होत असलेले वेतन, जिल्हा परिषदेच्या स्थानिक कार्यालयातून बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरण, उशिराने निवृत्तिवेतन मिळणे, कामाचा अतिरिक्त कार्यभार असूनदेखील अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे पदोन्नती वेळेत न करणे, वेळेत शिकाऊ काळ मंजूर न होणे, बरेच वर्षांपासून १०, २०, ३०च्या कालबद्ध पदोन्नती न भेटणे, सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध न करणे, विभागातून महत्त्वाच्या फाइली गहाळ होणे, अनेक दिवसांपासून वैद्यकीय बिलांना उशिरा मंजुरी देणे, अनेक कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची प्रलंबित प्रकरणे, कंत्राटी आरोग्यसेविका यांना अचानक कामावरून कमी करणे अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत.
निवेदन देण्यासाठी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा सहकार्याध्यक्ष विजय देशमुख, राज्य कार्याध्यक्ष-सुशील सोनवणे, जिल्हा संघटक-सुनील महाजन, तालुकाध्यक्ष- अजित बाविस्कर, सचिव- प्रशांत पाटील, आशा गजरे, कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष- संजय बाविस्कर, प्रकाश पारधी, नितीन चव्हाण, शशिकांत कुमावत, सुभाष शिरसाठ, सुनील भालेराव, नितीन चौधरी, अरुणा सूर्यवंशी, कंत्राटी आरोग्यसेविका- वैशाली धनगर, यशोदा रल सहभागी झाले होते.
चौकट :-
आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन तर सर्वात आधी व्हायला पाहिजे व तुमचे वेतन दरमहा कसे होईल, याबाबत तसेच कंत्राटी आरोग्यसेविका यांचा विषयदेखील मी स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलतो, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.