शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

गावी परतणाऱ्यांची आशा वर्कर, अंगणवाडी सेविका देणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:37 PM

‘कोरोना’विषयी उपाययोजना

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मुंबई, पुणे व अन्य शहरातून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही गावात बाहेर गावाहून आलेल्या व काही लक्षणे आढळल्यास त्यांची माहिती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्याचा निर्णaय शनिवारी झालेल्या कोरोना विषयक दैनंदिन आढावा बैठकीत घेण्यात आला. तशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.त्या वेळी ‘कोरोना’विषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासह येणाºया काळात काय उपाययोजना करावयाच्या आहे, या विषयी चर्चा करण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सदस्य सचिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, सदस्य जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण आदी उपस्थित होते.पुण्याकडून येणाºयांची संख्या अधिकसध्या पुणे येथून जिल्ह्यात येणाºयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे गावी परतणाºया सर्व जणांनी तसेच जिल्हावासीयांनीही काळजी घेणे गरजेचे असल्याने त्यासाठी या बाहेर गावाहून परणाºयांची माहिती ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीत सांगितले. यासाठी गावा-गावात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिल्या.१६ जणांची तपासणी, सर्व निगेटिव्हशनिवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १६ कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आली. या सर्व १६ जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या संशयित म्हणून केवळ दोन जण दाखल असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.जिल्हाभर सज्जतासुदैवाने जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नसून भविष्यात गंभीर परिस्थिती उद््भवल्यास प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात कक्ष उभारणीसह जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात येईल, असे नियोजन असून प्रसंगी खाजगी रुग्णालय, वसतिगृह यांचाही उपयोग करून घेतलाजाईलअशीमाहितीजिल्हाधिकाºयांनीदिली.व्हेंटीलेटरही पुरेसेरुग्णांची संख्या वाढली व त्यांच्यासाठी आवश्यक साधनांचीही व्यवस्था करण्यात आली असून रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची गरज भासल्यास त्यांचीही पुरेसी व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीनंतर सांगितले.खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करू नकासमितीची बैठक सुरू असताना जिल्हाधिकाºयांनी आयएमए व निमा या डॉक्टरांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांना तातडीने बोलावून घेतले. त्या वेळी त्यांच्याकडून खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या साधन-सामग्रीची माहिती घेतली. या सोबतच गरज नसताना कोणताही रुग्ण संशयित म्हणून शासकीय रुग्णालयात पाठवू नये व यंत्रणेवर ताण वाढवू नका, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी डॉक्टरांना दिल्या. जेवढे रुग्ण वाढले तेवढे प्रयोग शाळेवरही ताण येत असल्याने खाजगी डॉक्टरांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र कोरोनाची लक्षणे असणारा रुग्णही खाजगी रुग्णालयात ठेवून इतर रुग्णांना बाधा होणार नाही, यासाठी असे रुग्ण खाजगी रुग्णालयात ठेवू नका, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या. या वेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील, उपाध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, माजी सचिव डॉ. राजेश पाटील, निमाचे डॉ. राजेश पाटील उपस्थित होते.खाजगी डॉक्टर देणार सेवाखाजगी रुग्णालयात उपलब्ध व्हेंटिलिटरची माहिती जिल्हाधिकाºयांनी मागितली असून त्याची यादी आयएमए त्यांना देणार आहे. या सोबतच शासकीय रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडल्यास खाजगी डॉक्टरही तेथे सेवा देण्याची तयारी आयएमए व ‘निमा’ने दाखविली आहे.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव