तीन वर्षांपासून फरार चोरटा गावात येताच आवळल्या मुसक्या
By विजय.सैतवाल | Updated: February 26, 2024 00:25 IST2024-02-26T00:25:39+5:302024-02-26T00:25:52+5:30
ही कारवाई रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी पथराड येथे करण्यात आली

तीन वर्षांपासून फरार चोरटा गावात येताच आवळल्या मुसक्या
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील जगदीश बाळू शेळके (२३, रा. पथराड, ता. भडगाव) हा गावात येताच त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई रविवार, २५ फेब्रुवारी रोजी पथराड येथे करण्यात आली.
चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील जगदीश शेळके हा तीन वर्षांपासून फरार होता. तो गावात आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश चौभे, विजयसिंग पाटील, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, किरण चौधरी, सुधाकर आंभोरे, पोकॉ राहुल पाटील यांनी पथराड येथून त्याला ताब्यात घेतले. त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.