निवडणुकीमुळे घरमालक गावी जाताच साडेनऊ तोळे सोने लंपास; संभाजीनगरमध्ये घरफोडी
By विजय.सैतवाल | Updated: November 4, 2023 19:57 IST2023-11-04T19:57:18+5:302023-11-04T19:57:32+5:30
रोख ३० हजारही लांबविले

निवडणुकीमुळे घरमालक गावी जाताच साडेनऊ तोळे सोने लंपास; संभाजीनगरमध्ये घरफोडी
जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे तालुक्यातील पाथरी या आपल्या मूळ गावी कुटुंबीयांसह गेलेल्या पंडित तुळशीराम माळी (ह.मु. संभाजीनगर, जळगाव) यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने रोख ३० हजारांसह साडे नऊ तोळ्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
मूळ पाथरी येथील रहिवासी असलेले पंडित माळी हे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला आहेत. त्यामुळे ते कुटुंबीयांसह जळगावातील संभाजीनगर परिसरात राहतात. पाथरी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने ते कुटुंबीयांसह गावी गेले होते. त्यावेळी शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व रोख ३० हजार रुपयांची रक्कम, साडे नऊ तोळ्यांचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. शनिवारी माळी यांच्या पत्नी घरी आल्या त्यावेळी घटना समोर आली. त्यांनी पती पंडित माळी यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली व रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.