शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

बिलं वाटप झालेल्या गाळेधारकांना भरावीच लागेल थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:14 IST

‘लोकमत’भेटी दरम्यान मनपा आयुक्तांची माहिती

जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मार्च २०१९ पर्यंत थकीत भाडे भरण्यासाठी देण्यात आलेल्या बिलांची रक्कम मनपाकडे भरावीच लागणार आहे. बिलांच्या रक्कमेत कोणतीही घट करणे शक्यच नसून गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ च्या शहर कार्यालयात सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी मनपासमोर असलेल्या अडचणी व त्या अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. आपल्या कार्यकाळात मनपातील सर्व रिक्त असलेल्या शासकीय पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून, मनपात चांगल्या अधिकाºयांची टीम तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती या भेटीप्रसंगी देत शहर विकासवर आपला भर राहणार असल्याची ग्वाही दिलीआर्थिक समस्या हेच मनपासमोर आव्हानमनपाची सूत्रे सांभाळण्याआधी या ठिकाणच्या आर्थिक समस्येविषयीची माहिती असल्याने कुठलेही व्हिजन घेवून आपण मनपाची सूत्रे हाती घेतली नसल्याची माहिती आयुक्त टेकाळे यांनी दिली. मनपाची आर्थिक परिस्थती बेताची असल्यानेच सर्व समस्या निर्माण झाल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले.ही समस्या दूर करण्यासाठी मनपाकडे एकमेव पर्याय मुूदत संपलेल्या मार्केटमधील गाळेच असून, आपल्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.मलनिस्सारण योजनेचे निविदांचे काम अंतिम टप्प्यातअमृत अंतर्र्गत मंजूर झालेल्या मलनिस्सारण योजनेच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आचारसंहिता संपल्यानंतर निविदा उघडल्या जाणार असून, लवकरच कार्यादेश देवून हे काम सुरु करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.अमृतचे काम नोव्हेंबरअखेरतसेच १०० कोटीतील ५० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून, या कामांच्या निविदा काढून कामे दोन-तीन महिन्याचा काळात सुरु होणार आहेत.याशिवाय अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम देखील नोव्हेंबर महिन्यात पूर्णहोणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. टेकाळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.नवीन पंप बसविल्यामुळे अनेक भागांमधील पाण्याची समस्या मार्गी लागेलशहरातील अनेक उंच भागात पाणी पोहचत नसल्याचा अनेक तक्रारी मनपाकडे प्राप्त होत आहेत. वाघूर पंपीगजवळ असलेले दोन पंप हे जुने झाल्यामुळे धरणातून पाण्याची उचल चांगल्या पध्दतीने होत नव्हती. त्यामुळे अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र, बुधवारीच वाघूर पंपीग स्टेशनवर दोन नवे पंप बसविल्यामुळे पाण्याची उचल ही ९० ते ९५ टक्के होणार असल्याने ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्या भागात देखील जास्त दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव