उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगावात आगमन
By विलास.बारी | Updated: June 27, 2023 14:22 IST2023-06-27T14:21:24+5:302023-06-27T14:22:45+5:30
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगावात आगमन
विलास बारी, जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, लता सोनवणे, महापौर जयश्री महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी, चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनीही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.