Arrested for prolonging the chain | चैन लांबविणाऱ्यास अटक

चैन लांबविणाऱ्यास अटक

जळगाव : पिस्तोलचा धाक दाखवून महिलेची चैन लांबविनारा गणेश भास्कर सोनार (रा.लक्ष्मीनगर) यास जिल्हा पेठ पोलिसांनी अग्रवाल चौकात पाठलाग करुन गुरुवारी रात्री अटक केली आहे. शहरातील अथर्व हॉस्पिटलजवळ गणेश सोनार याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पिस्तोल चा धाख दाखवुन एका महिलेची सोन्याची चैन लांबविली होती. याबाबत महिलेच्या फिर्यादी वरुण जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा पेठ पोलिस स्टेशन मधील डी बी कर्मचारी नाना तायडे यांना संशयित हा अग्रवाल चौकात असल्याची माहिती गुरुवारी रात्री मिळाली.त्या नुसार लागलीच नाना तायडे यांचा सह शेखर जोशी, अजित पाटिल, अविनाश देवरे, प्रशांत जाधव, फिरोज तड़वी यानी अग्रवाल चौकाकड़े धाव घेतली. मात्र पोलिस दिसताच गणेश याने पसार होण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला पाठलाग करुन अटक केली.

Web Title: Arrested for prolonging the chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.