ट्रक चालकाकडील मोबाईल लांबविणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:03 IST2019-08-27T12:57:36+5:302019-08-27T13:03:26+5:30
जळगाव : ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून मोबाईलवर चित्रपट पाहत असताना ट्रक चालक व क्लिनर या दोघांचे मोबाईल हिसकावून पळालेल्या गणेश ...

ट्रक चालकाकडील मोबाईल लांबविणाऱ्यास अटक
जळगाव : ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून मोबाईलवर चित्रपट पाहत असताना ट्रक चालक व क्लिनर या दोघांचे मोबाईल हिसकावून पळालेल्या गणेश बाबुराव बाविस्कर (रा.कडगाव, ता.भुसावळ) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली. यापूर्वी या गुन्ह्यात गोविंदा रवींद्र बाविस्कर याला अटक झाली होती. २५ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता औरंगाबाद रस्त्यावर ही घटना घडली होती.
मुकेश हजारे अजनारे (२१, रा.ताराबावडी, ता.भगवानपुरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) हा व त्याचा सहकारी ट्रक (क्र.एम.एच.१८ बी.जी. ६३७१) घेऊन २५ रोजी जळगावात आले होते. एमआयडीसी भागात औरंगाबाद रस्त्यावर मारुती शोरुमपासून काही अंतरावर रात्री १ वाजता मोबाईलमध्ये चित्रपट पाहत असताना दुचाकीवरुन (क्र.एम.एच. १४ ईजी.५१५५) गोविंदा रवींद्र बाविस्कर व त्याचा साथीदार गणेश बाबुराव बाविस्कर (रा.कडगाव, ता.भुसावळ) हे दोघं जण आले. ट्रक चालक व आणि क्लिनर या दोघांचे १० हजार रुपये किमतीचे मोबाईल हिसकावून पळ काढला. क्लिनरने पाठलाग करून एकास पकडले.