चाळीसगावच्या नायब तहसीलदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:26 PM2020-02-26T12:26:07+5:302020-02-26T12:27:36+5:30

एसीबीची कारवाई 

Arrest of Naib tahsildar of Chalisgaon | चाळीसगावच्या नायब तहसीलदाराला अटक

चाळीसगावच्या नायब तहसीलदाराला अटक

googlenewsNext

जळगाव : जळगावचे तत्कालीन व चाळीसगावचे विद्यमान नायब तहसीलदार देवेंद्र सुरेश भालेराव (५२, रा. मोहन नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पाठलाग करुन साडे सहा वाजता ख्वॉजामिया चौकातून अटक केली.
वडीलोपार्जीत घर नावावर करण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला २०१६ मध्ये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणाची चौकशी व न्यायालयात आरोपीने या प्रकरणात नायब तहसीलदार भालेराव यांचाही सहभाग असल्याचे सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने भालेराव यांना हजर राहण्याचे समन्स काढले होते. दोनवेळा समन्स काढल्यावरही भालेराव हजर झाले नाहीत, त्यामुळे न्यायालयाने मंगळवारी अटक वारंट काढले.
असा रचला सापळा
न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, ईश्वर धनगर, प्रशांत ठाकूर व इतर सहकाऱ्यांना सापळा लावण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने काही कर्मचारी चाळीसगाव तहसील कार्यालय तर काही कर्मचारी भालेराव याच्या घराच्या बाहेर तैनात केले होते. भालेराव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आल्याचे समजले. सायंकाळी ते तेथून घरी गेले. घरुन दहा मिनिटात ते बाहेर निघाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, ईश्वर धनगर व प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा पाठलाग करुन ख्वॉजामिया चौकात त्यांना अडवले. तेथून अटक केल्यानंतर रात्री त्यांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले.

Web Title: Arrest of Naib tahsildar of Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव