चाळीसगाव : तालुक्यातील सात हजार वीज कनेक्शन कट केल्याने संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव येथे महावितरणच्या अधीक्षकांना खुर्चीला बांधत शुक्रवारी आंदोलन केले होते. यानंतर त्यांना अटक झाली. याचे पडसाद येथे उमटले असून अटकेचा निषेध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी रास्तारोको तर भाजपने आंदोलन केले.चाळीसगाव तालुक्यातील सात हजार वीज कनेक्शन महावितरण कंपनीकडून कट करण्यात आले. याची झळ बसलेल्या शेतकऱ्यांनी आपली कैफियत आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मांडल्यानंतर ते संतप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत जळगाव येथे महावितरणच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. अधीक्षकांना खुर्चीला बांधून आंदोलकांनी राग व्यक्त केला. आंदोलनाचे वृत्त राज्यभर पसरले. आमदार चव्हाण यांच्यासह ३० ते ३५ शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेर्धात शुक्रवारी रात्री सिग्नल चौकात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार समर्थन करीत आंदोलन केले.मशाली पेटवल्याआमदार चव्हाण यांना अटक झाल्याची वार्ता चाळीसगावी पसरताच सिग्नल चौकात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी येथे घोषणाबाजी करीत अटकेचा निषेध केला. राज्य सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करीत मशाली पेटवल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.हिंगोणे येथे रास्ता रोकोशनिवारी सकाळी साडेनऊ वाजता जळगाव-चांदवड महामार्गावर हिंगोणे येथे शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रास्तारोको आंदोलन केले. आमदार चव्हाण यांच्या अटकेचा निषेध करीत घोषणाबाजीही केली.हिरापूर, ता.चाळीसगाव येथेही शनिवारी दुपारी आमदारांच्या अटकेचा निषेध म्हणून भाजपने रस्तारोको केले.शिरसगावातही तरुण शेतकऱ्यांनी चव्हाण यांच्या अटकेचा निषेध केला. १०० कोटी खंडणी मागणाऱ्याविरुद्ध काहीही होत नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद करणाऱ्या शेतकरी पुत्राला तुरुंगात टाकले जाते. हे अन्यायकारक असल्याने आम्ही निषेध करतो, असे या शेतकऱ्यांनी सांगितले.देवळी-तळेगाव जि.प.गटातील शेतकऱ्यांनी तळेगाव येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आमदार चव्हाण यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेचे चाळीसगावात पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 14:45 IST
आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेचे चाळीसगावात पडसाद उमटले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेचे चाळीसगावात पडसाद
ठळक मुद्देहिंगोणे व हिरापूर येथे रास्तारोकोसिग्नल चौकात भाजपचे आंदोलनशेतकऱ्यांनीही दिली निवेदने