पारोळा येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडय़ा

By Admin | Updated: May 28, 2017 17:27 IST2017-05-28T17:27:49+5:302017-05-28T17:27:49+5:30

पारोळा शहरात मध्यरात्री एकाच कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाली.

Around the same day in Parola, | पारोळा येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडय़ा

पारोळा येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडय़ा

>ऑनलाईन लोकमत
पारोळा,दि.28- शहरात मध्यरात्री एकाच कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाली. यात चोरटय़ांनी एका घरातून 2500 रूपयांचा ऐवज लंपास झाला. तर दुस:या घरात चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही.
मध्यरात्री भंडारी नगर येथे व्ही.एम.जैन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय बडगुजर हे परिवारासह नाशिक येथे गेले होते. चोरटय़ांनी हे निमित्त साधत कूलूप तोडून ात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेला सामान अस्ताव्यस्त केला. तसेच रोख 2500 रूपये लंपास केले. बडगुजर यांचे भाडेकरू असलेले नितीन पाटील हे सकाळी उठल्यावर त्यांचा चोरी झाल्याचे समजले. 
त्यानंतर चोरटय़ांनी पश्चिम शिक्षक सोसायटीचे कर्मचारी शरद काशिनाथ पाटील यांचे घर गाठले. पाटील हे गच्चीवर झोपलेले होते. चोरटय़ांनी कुलूप उघडून घरात प्रवेश केला. सुटकेस, तिजोरी उघडली. मात्र हाती काहीच लागले नाही. त्यांनी घरात असलेली पर्स लंपास केली. या  दोन्ही चोरी प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आलेली आहे. 

Web Title: Around the same day in Parola,