फुलगाव येथे सशस्त्र दरोडा, वृद्धेला चाकूचा धाक दाखवत लांबविले सहा तोळे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 12:59 IST2017-09-29T12:54:46+5:302017-09-29T12:59:59+5:30

दरोडेखो:यांमध्ये महिलांचाही समावेश

Armed robbery at Phulgaon, while stabilizing the old man, knocking him six Tola gold | फुलगाव येथे सशस्त्र दरोडा, वृद्धेला चाकूचा धाक दाखवत लांबविले सहा तोळे सोने

फुलगाव येथे सशस्त्र दरोडा, वृद्धेला चाकूचा धाक दाखवत लांबविले सहा तोळे सोने

ठळक मुद्दे 11 हजाराची रोख रकमही लंपास टामीच्या सहाय्याने कडी तोडून घरात प्रवेशदोन दरोडेखोर घरात शिरले

ऑनलाईन लोकमत

वरणगाव, जि. जळगाव, दि. 29 - भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील माजी सैनिक कॉलनीमधील रहिवासी दीपक निवृत्ती पाटील यांच्या घरात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सहा तोळे सोने व रोख अकरा हजार रुपये लांबविले. 
घराच्या लोखंडी दरवाजाची कडी टामीच्या सहाय्याने तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. या वेळी मागील खोलीत झोपलेल्या दीपक पाटील व मुलांच्या खोलीला बाहेरुन कडी लावून घेतली व समोरच्या खोलीत झोपलेल्या दीपक पाटील यांच्या आई कमलाबाई पाटील (60) यांच्या गळ्य़ावर चाकू ठेवत त्यांच्या जवळील 6 तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. सोबतच कपाटातील रोख 11 हजार रुपये लंपास केले. यात दोन दरोडेखोर घरात शिरले होते तर काही जण बाहेर थांबून असल्याची माहिती मिळाली. दरोडेखोरांमध्ये महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 
या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Armed robbery at Phulgaon, while stabilizing the old man, knocking him six Tola gold