अर्जुन जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:16 IST2021-03-19T04:16:35+5:302021-03-19T04:16:35+5:30

जळगाव : अर्जुनराव जगताप (७५) यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. रत्नाकर वाणी जळगाव : रत्नाकर वाणी ...

Arjun Jagtap | अर्जुन जगताप

अर्जुन जगताप

जळगाव : अर्जुनराव जगताप (७५) यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

रत्नाकर वाणी

जळगाव : रत्नाकर वाणी (५९, रा.लक्ष्मीनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तुषार वाणी यांचे ते वडील होत.

मोहन राजे

जळगाव : मोहन राजे (७०, रा.प्रेमनगर) यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लि.चे उत्तर महाराष्ट्र विभागीय जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

सूर्यकांत बरकुले

जळगाव : सूर्यकांत बरकुले यांचे बुधवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, मुलगा असा परिवार आहे. चंद्रकांत बरकुले यांचे ते बंधू होत.

विनोद गावंडे

जळगाव : विनोद गावंडे (७०, रा. तरसोद) यांचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, असा परिवार आहे. किशोर पाटील यांचे ते बंधू होत.

सुनीता ठाकूर

जळगाव : सुनीता ठाकूर (४६, रा.वाघ नगर) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. यावल येथील न्यायालय कर्मचारी स्वप्निल ठाकूर यांच्या त्या मातोश्री होत.

प्रा.डॉ. किशोर सरोदे

जळगाव : प्रा.डॉ. किशोर सरोदे (६३, रा.गरुड प्लॉट, भुसावळ) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुमित सरोदे यांचे ते वडील होत.

रुख्मिणी सपकाळे

जळगाव : रुख्मिणी सपकाळे (६६, वाल्मीकनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वा. निघेल. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. म.न.पा. कर्मचारी दीपक सपकाळे यांच्या त्या आई होत.

फकिरा पवार

जळगाव : फकिरा पवार (१०२,रा.श्रीकृष्ण नगर, जुनेगाव) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. राजेंद्र पवार यांचे ते वडील होत.

भीमसिंग पाटील

जळगाव : भीमसिंग पाटील (महाले) (७९, रा.महाबळ कॉलनी) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महेंद्रसिंग पाटील यांचे ते वडील होत.

Web Title: Arjun Jagtap