शिक्षण मंडळ नाशिक विभागीय समितीवर अमळनेरचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:42 IST2019-09-14T23:38:45+5:302019-09-14T23:42:16+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागावर मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Appointment of Prakash Patil, Principal of Amalner on the Board of Education, Nashik Divisional Committee | शिक्षण मंडळ नाशिक विभागीय समितीवर अमळनेरचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांची नियुक्ती

शिक्षण मंडळ नाशिक विभागीय समितीवर अमळनेरचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांची नियुक्ती

ठळक मुद्देअशासकीय सदस्य म्हणून झाली नियुक्तीशिक्षणाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी केले नियुक्तीचे स्वागत

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागावर मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या १३ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या उपसचिव राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णयानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, संस्थेचे चेअरमन श्रीकांत पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.ए.पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले आहे.

Web Title: Appointment of Prakash Patil, Principal of Amalner on the Board of Education, Nashik Divisional Committee