जिल्हा नियोजन समितीवर १८ सदस्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 21:00 IST2021-03-16T21:00:40+5:302021-03-16T21:00:55+5:30
जळगाव : जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची समजल्या जाणा-या जिल्हा नियोजन समितीवर (डिपीडीसीवर) नामनिर्देशित आणि विशेष ...

जिल्हा नियोजन समितीवर १८ सदस्यांची नियुक्ती
जळगाव : जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची समजल्या जाणा-या जिल्हा नियोजन समितीवर (डिपीडीसीवर) नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित १८ सदस्यांच्या नियुक्त्या नियोजन विभागाने केल्या आहेत.
१८ सदस्यांमध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ४ नामनिर्देशित सदस्यांचा तर सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या १४ व्यक्तींची विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे़ या नियुक्तींना शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
- जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्यांमध्ये धानवड येथील शिवराज पाटील, जळगावातील राधेश्याम कोगटा, मुक्ताईनगर तालुक्यातील अॅड. रोहिणी खेवलकर, धरणगाव तालुक्यातील डॉ.डी.जी.पाटील (धरणगाव) यांची नियुक्ती झाली आहे.
- दरम्यान, विशेष नियमंत्रित सदस्यांमध्ये मनोहर पाटील (ता़पाचोरा),अॅड. साहेबराव सोनवणे, डॉ़ सुरेश पाटील (चोपडा), विजय पाटील (पारोळा), वाल्मिक विक्रम पाटील, नितीन लढ्ढा (जळगाव), संजय गरुड (जामनेर), दिलीप वाघ (पाचोरा), मनोहर खैरनार (मुक्ताईनगर), भागवत पाटील (अमळनेर), शेखर पाटील (यावल), प्रल्हाद महाजन (रावेर), रोहिदास पाटील (चाळीसगाव), मनिषा परब (अमळनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.