वसुलीच्या अंतिरिम स्थगितीचा अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST2021-02-05T05:51:51+5:302021-02-05T05:51:51+5:30

जळगाव : पुष्पलता बेंडाळे चौकातील अल्पबचत व्यापारी संकूलातील १८ गाळेधारकांनी गाळेभाडे वसुलीला अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल ...

The application for interim stay of recovery was rejected | वसुलीच्या अंतिरिम स्थगितीचा अर्ज फेटाळला

वसुलीच्या अंतिरिम स्थगितीचा अर्ज फेटाळला

जळगाव : पुष्पलता बेंडाळे चौकातील अल्पबचत व्यापारी संकूलातील १८ गाळेधारकांनी गाळेभाडे वसुलीला अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जांवर सोमवारी कामकाज होवून अर्ज फेटाळून लावण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्यावतीने कामकाज पाहणारे अ‍ॅड. हरूल देवरे यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे पुष्पलता बेंडाळे चौक परिसरात अल्पबचत व्यापारी संकूल आहे. कायदेशीर तरतुदींचा अवलंब करूनच गाळ्यांचा कब्जा घ्यायच्या सूचना न्यायालयाने जिल्हा परिषदला दिल्या होत्या. त्यानुसार २० गाळेधारकांना गाळेभाडे वसुलीसंदर्भात जिल्हा परिषदेच्यावतीने नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, १८ गाळेधारकांनी वसुलीला अंतिरिम स्थगिती मिळावी, यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जांवर कामकाज होवून सोमवारी त्या १८ गाळेधारकांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदतर्फे अ‍ॅड. हरुल देवरे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: The application for interim stay of recovery was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.