पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:26+5:302021-07-28T04:17:26+5:30
जळगाव : राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांतील शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. ...

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव : राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांतील शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल ही ११ पिके समाविष्ट आहेत. पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खरीप हंगामातील मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी अंतिम ३१ ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
------
वस्त्रोद्योग पदविकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील या शैक्षणिक सत्राकरिता तीनवर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरचढ, ओडिशा येेथे १३ जागा, तर वेंकटगिरीकरिता २ जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांच्यातर्फे २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शीतल उगले यांनी केले आहे.
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव : २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतील. जिल्ह्यातील अशा पहिल्या एक ते तीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना महामंडळाकडून वितरण केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा कार्यालयात संर्पक करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले आहे.