`आधार`शी मोबाईल नंबर लिंक करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST2021-01-16T04:19:17+5:302021-01-16T04:19:17+5:30
जळगाव : जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांनी रेशन दुकानावर जाऊन आधारकार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक करुन घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या ...

`आधार`शी मोबाईल नंबर लिंक करण्याचे आवाहन
जळगाव : जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांनी रेशन दुकानावर जाऊन आधारकार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक करुन घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या वार्षिक उत्पन्नाबाबत हमीपत्र भरून देणे सुद्धा आवश्यक आहे. हे हमीपत्र रेशन दुकानदार यांच्याकडे उपलब्ध आहे. असे आवाहन जळगाव जिल्हा सरकारमान्य रेशन दुकानदार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव यशवंत घोडेस्वार, सामाजिक कार्यकर्ते आनंदा तायडे, गौतम सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा कामगार आघाडीच्या सरचिटणीसपदी सुनील भावसार
जळगाव : भाजपच्या कामगार आघाडी जिल्हा महानगरची नुतन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष कुमार सिरामे यांनी नुकतीच जाहीर केली असून, सरचिटणीसपदी सुनील भावसार व देवेंद्र सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या कार्यकारिणीत उपाध्यक्ष चार, सरचिटणीस चार, कोषाध्यक्ष एक, प्रसिद्धी प्रमुख एक, सहप्रसिद्धी प्रमुख एक, कार्यालयीन मंत्री एक, सोशल मीडिया प्रमुख व तेरा सदस्य अशी कार्यकारिणी आहे.