फैजपुर: ॲपेडाच्या केळी क्लस्टरमध्ये महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असून या भागातील केळी ही परदेशामध्ये निर्यात व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या ॲपेडा या संस्थेकडून सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहकार्य राहील, असे प्रतिपादन प्रभारी अधिकारी लोकेश गौतम यांनी केले.
येथील धनाजी नाना महाविद्यालयात रावेर यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी यांची केळी संदर्भातील कार्यशाळा ॲपेडा (अग्रीकल्चर अँड प्रोसेस फुड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलमेंड ॲथोरटी) व कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी सकाळी १० ते ५ या काळात संपन्न झाली. यावेळी गौतम बोलत होते. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना निर्यात उत्पादन केळी तंत्रज्ञान,निर्यातक्षम केळीत ॲपेडाची भूमिका, निर्यातक्षम केळी उत्पादन, केळी पीक रोग व्यवस्थापन, मूल्यवर्धन व्यवस्थापन निर्यातक्षम केळीकरिता संसाधानाची गरज, निर्यातक्षम केळी उत्पादनात वाढ या विविध विषयांवर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार शिरीष चोधरी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी केळी संशोधन केंद्र जळगावचे प्राचार्य सी.डी.बडगुजर,केळीतज्ञ के.बी.पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, शास्त्रज्ञ किरण जाधव, प्रकल्प अधिकारी एम.एल. चौधरी तसेच केळी निर्यातदार व केळी ऊत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरीष चौधरी
ॲपेडा व कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर व यावल तालुक्यातून केळी निर्यातीच्या वाटेवर आहे. उत्पादन वाढले पाहिजे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे, असे आमदार शिरीष चौधरी म्हणाले.
डॉ.सी.डी.बडगुजर -
जिल्ह्यात केळी लागवडीस रावेर तालुक्याच्या कोचूर गावापासून सुरुवात झाली असून जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली जात आहे. आता परदेशीय बाजारपेठ काबीज करण्याची निर्यात पूरक केळीचे उत्पादन शेतकऱ्याने घेतले पाहीजे यासह केळी लागवडीपासून ते कापणीपर्यंत विविध समस्येचे मार्गदर्शन डॉ.सी.डी. बडगुजर केले.
गुणवत्तेशिवाय पर्याय नाही
(के.बी. पाटील,केळीतज्ज्ञ)
आता केळीच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. जळगावातील केळी ही विशिष्ट असून निर्यातीचा चांगला मार्ग ॲपेडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर उपलब्ध आहे, असे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आता काम करून व निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेऊन जागतिक बाजारपेठ काबीज करण्यात करावी, असे केळीतज्ज्ञ के.बी.पाटील म्हणाले.
केळी संदर्भातील मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करताना आमदार शिरीष चौधरी व मान्यवर.