अनुष्का शर्मालाही आलयं नवीन बजरंग बोगद्याचा टेन्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:31 IST2018-08-25T21:25:17+5:302018-08-25T21:31:00+5:30
तीन कोटी रूपये खर्च करून उभा केलेला नवीन बजरंग बोगद्यात पाणी साचत असल्यामुळे त्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी येत असल्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आता बोगद्याबाबात टेन्शन आलयं अशी विनोदी पोस्ट सध्या व्हॉट्स अॅपच्या प्रत्येक गु्रपवर पहायला मिळत आहे़

अनुष्का शर्मालाही आलयं नवीन बजरंग बोगद्याचा टेन्शन!
जळगाव- तीन कोटी रूपये खर्च करून उभा केलेला नवीन बजरंग बोगद्यात पाणी साचत असल्यामुळे त्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी येत असल्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आता बोगद्याबाबात टेन्शन आलयं अशी विनोदी पोस्ट सध्या व्हॉट्स अॅपच्या प्रत्येक गु्रपवर पहायला मिळत आहे़ पोस्टमुळे बोगद्यासह अधिकाऱ्यांवर ग्रुपमध्ये चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत आहे़
मनपा व रेल्वे प्रशासनाकडून नवीन बजरंग बोगदा तयार करण्यात आल्यानंतर अधिकाºयांना गणेश कॉलनीकडून येणाºया नाल्याच्या पाणीला वळविण्याचा विसरच पडला़ अन् बोगद्या वाहनधारकांसाठी सुरू न होता उलट तयार त्यात नाल्यासह पावसाचे पाणी साचत सुरूवात झाली़ काही दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे नवीन बजरंग बोगद्यात कमरेएवढे पाणी साचल्यामुळे त्या पाण्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी आल्यामुळे सोशल मीडियावर बोगद्यात साचलेल्या पाण्यात बसलेल्या म्हशींचा फोटो व्हायरल होऊन चांगल्याच चर्चांना उधान आला आहे़ एवढेच नव्हे तर आता त्या फोटो वर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा लवकरच येत असेल्या एका चित्रपटातील साडी लुक असलेला फोटो जोडून आता अनुष्काला ही या तीन कोटीच्या बोगद्याचं टेन्शन आलयं अशी पोस्ट दोन दिवसांपासून प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत आहे़ यावरून वाहनधारकांच्या सोयीसाठी तयार केलेला हा बोगदा आता विनोदाचा भाग होऊन चुकला असून अधिकारी पाणी कसे साचणार नाही, यासाठी हालचाली करण्यासाठी कधी मुहुर्त साधणार याकडे सर्वांकडे लक्ष लागून आहे़