शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

महापत्रकारांच्या प्रश्नांना तनय, लोकेश व ओमप्रकाशची दिलखुलास उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:55 IST

तुम्ही यश कसे मिळविले, आपल्या यशाचे श्रेय कुणाला देणार? तुमचे आदर्श कोण? भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती महापत्रकारांनी नृत्य स्पर्धेत देशाच्या नकाशावर जळगावचे नाव झळकविणारा तनय मल्हारा, खगोल आॅलिम्पियाडमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणारा लोकेश कोल्हे व बालवैज्ञानिक ओमप्रकाश अटाळे यांच्यावर केली. महापत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांचे दिलखुलासपणे उत्तरे दिली.

ठळक मुद्देबालदिनानिमित्त लोकमत ‘महापत्रकार’ उपक्रम १० शाळांमधील विद्यार्थी बनले पत्रकार ‘लोकमत’च्या या उपक्रमाने विद्यार्थी भारावले

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.१०-तुम्ही यश कसे मिळविले, आपल्या यशाचे श्रेय कुणाला देणार? तुमचे आदर्श कोण? भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती महापत्रकारांनी नृत्य स्पर्धेत देशाच्या नकाशावर जळगावचे नाव झळकविणारा तनय मल्हारा, खगोल आॅलिम्पियाडमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणारा लोकेश कोल्हे व बालवैज्ञानिक ओमप्रकाश अटाळे यांच्यावर केली. महापत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांचे दिलखुलासपणे उत्तरे दिली.

निमित्त होते बालदिनाचे. ‘लोकमत’तर्फे सोमवारी बालदिनाचे औचित्य साधून ‘महापत्रकार’ हा  आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाव्दारे शहरातील दहा शाळांमधील दहा विद्यार्थी रविवारी पत्रकार बनले. त्यांनी एका वाहिनीवरील डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस अशा मोठ्या नृत्य स्पर्धांमध्ये आपली छाप सोडणारा तनय मल्हारा, चीन मधील व्हिहाई येथे झालेल्या खगोल आॅलिम्पियाड स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त लोकेश कोल्हे व अवघ्या १५ व्या वर्षीच ‘क्वॉन्टम मेकॅनिक्स’ या विषयावरील पुस्तक लिहणारा बालवैज्ञानिक ओमप्रकाश अटाळे या तिन्ही पाहुण्यांची मुलाखत घेतली. त्यानंतर ‘लोकमत’ कार्यालयाची पाहणी करुन विविध विभागांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर कुणी निबंध लिहिला तर कुणी कविता केल्या. चित्र रंगविले.  ‘लोकमत’च्या या उपक्रमाने विद्यार्थी भारावले. पालक व शिक्षकांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी केले.

इतरांसाठी प्रेरणा ठरेल असे काम करायचेय...-तनय मल्हाराजळगाव-जीवनात जी गोष्ट आवडते त्याचाच विचार करून आयुष्य जगण्याससुरुवातकेलीआहे... ज्या व्यासपीठावर सादरीकरण करायचे आहे, ते व्यासपीठ किती मोठे व कोणते आहे. याचा विचार न करता केवळ त्या व्यासपीठावर स्वत:ला सिध्द करणे महत्वाचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात एवढ्या पुढे जायचे आहे की आपण स्वत: इतरांसाठी  प्रेरणा ठरु,असेकाम करण्याची इच्छा आहे,असेतनय मल्हारा म्हणाला.

नृत्यासोबतच योगाचीही आवड टि.व्ही.वरील नृत्य स्पर्धेतून माझी ओळख ही एक नृृत्य कलाकार अशी झाली आहे. मला नृत्य करणे खूप आवडते. मात्र त्या सोबतच योगाचीदेखील मला प्रचंडआवड असून, शहरातील एका कार्यक्रमात योगाचे सादरीकरण पाहिल्यानंतर योग देखील करण्याचा विचार माझ्या मनात आला.योगामुळेआरोग्य देखील निरोगी राहते व नृत्यासाठी शरीर देखील लवचिक बनते.

मुलांनी तनयला नृत्यामधील आदर्श कोण ? याबाबत प्रश्न विचारल्यावर तनय म्हणाला की, अद्याप नृत्य मध्ये कोणीही माझा आदर्श नाही. मात्र अनेक मोठ्या कलाकारांना पाहून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आवडीच्या क्षेत्रात एवढ्या पुढे जायचे आहे की आपण स्वत: इतरांसाठी आपल्या क्षेत्रातील  प्रेरणा ठरु असे काम करण्याची इच्छा तनयने यावेळी व्यक्त केली.

आई-वडिलांचा पाठिंबा आवश्यकडी.आय.डी., डान्स प्लस असो किंवा शाळास्तरावरील स्पर्धा.कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेवून त्यात यश मिळविण्यासाठी माझ्या आई-वडिलांचा मोलाचावाटा राहिला आहे. माझ्या काही आवडी या माझ्या आईमुळे आहेत. यामध्ये योग चा देखील समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी आई-वडिलांचा पाठिंबा आवश्यक असल्याचे तनयने सांगितले.

-----

आवड असलेल्याच गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा-लोकेश कोल्हे

ज्या क्षेत्रात किंवा ज्या गोेष्टीत आपल्याला आवड आहे. त्याच विषयावर आपण लक्ष केंद्रीत करुन जोरदार तयारी केल्यास यश हमखास मिळते. स्वअध्ययनावर भर द्यावा, हा यशाचा मंत्र लोकेश कोल्हे याने दिला.  

आॅलम्पियाड परीक्षेची माहिती आईने दिलीआंतरराष्टÑीय खगोल आॅलिम्पियाड या स्पर्धेबाबत माहिती नव्हती. मात्र आईने याबाबतची माहिती वृत्तपत्रात वाचली होती. आई-बाबांनी सांगितल्यानंतर ही परीक्षा देण्याचा  विचार केला. जून २०१६ मध्ये या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. औरंगाबादमध्ये झालेल्या पात्रता परीक्षेत यश मिळाल्यानंतर, देशभरातील मुलांमधून माझी दुसºया पात्रता परीक्षेसाठी निवड झाली. त्यात ३० मुलांची व नंतर शेवटच्या परीक्षेत देशभरातून केवळ माझ्यासहतीन मुलांची निवड झाली.

भविष्यात काय व्हायचे याचा अद्याप विचार नाहीस्पर्धेत देशभरातून केवळ तीन विद्यार्थ्यांचीच निवड झाली व त्यामध्ये मी एक होतो. त्यामुळे नक्कीच आनंद झाला होता. मात्र दबाव देखील होता. सध्या केवळ नववीचा अभ्यास सुरु असून, भविष्यात काय व्हायचे याबाबत कोणताही विचार केला नसून, आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याचा विचार माझा आहे.  सकाळी ६ वाजता उठून ७ वाजता शाळेत जातो, त्यानंतर दुपारी शाळेतून घरी आल्यावर दुपारी २ ते ५ अभ्यास करतो, व ५ ते ६ पर्यंत बाहेर फिरायला जातो. त्यानंतर एक-दीड तास अभ्यास केल्यानंतर झोपी जातो असे दिवसभराचे नियोजन असते.

---

विषयाचे ज्ञान व इच्छाशक्तीच्या जोरावर १५ व्या वर्षीच लिहिले पुस्तक-ओमप्रकाश अटाळे

प्रत्येक विद्यार्थ्याकडे कोणत्यातरी एका विषयात चांगले ज्ञान असते. त्याचा त्या विद्यार्थ्याने सखोल अभ्यास करावा. त्याची इतरांना माहिती द्यावी. या गोष्टी व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरच मी वयाच्या १५ व्या वर्षीच ‘श्रोडिंग इक्वेशन फॉर इलिमेंन्ट्स भाग १हेपुस्तकलिहिले, असे ओमप्रकाश अटाळे याने सांगितले.

‘क्वॉन्टम मेकॅनिक्स’ वर संशोधनओमप्रकाश म्हणाला, केसीई सोसायटीच्या ओरियन सीबीएसई स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, सध्या ‘क्वॉन्टम मेकॅनिक्स’ या विषयावर संशोधन सुरु केले आहे. या संशोधनातील पहिल्या सहा इलिमेंट्स मधील हायड्रोजन वगळता इतर पाच इलिमेन्ट्ससाठी श्रोडिंगर इक्वेशन’ लिहले आहेत. संशोधनाचा फायदा टाईम इव्होलुशन आणि स्टेट इव्होलूशन आॅफ क्वॉन्टम सिस्टिम आॅफ इलेक्टोनसाठी होऊ शकतोे. आतापर्यंत या विषयात झालेल्या संशोधनधून अचूक उत्तर न मिळाल्याने ‘श्रोडिंग इक्वेशन फॉर इलिमेंन्ट्स भाग १’ हे पुस्तक लिहिले.

इंटरनेटव्दारे केला अभ्यास‘क्वॉन्टम मेकॅनिक्स’बाबत अभ्यासासाठी किंवा हे पुस्तक लिहण्यासाठी मी कोणाचीही मदत घेतली नाही. सर्व संशोधन पूर्ण करण्यासाठी इंटरनेटचा वापर केला. इक्वेशन लिहण्याची सवय असून, त्यातूनच हे पुस्तक लिहले असल्याचेही त्याने सांगितले. चार महिन्यानंतर हे पुस्तक लिहल. पुस्तक लिहून झाल्यावर आई-वडिलांना मोठा आनंद झाला. हे पुस्तक लिहताना मित्रांनी देखील मोठी मदत केली.

तबल्यावर लिहायचे होते पुस्तकमी ‘क्वॉन्टम मेकॅनिक्स’वर अभ्यास केला असला तरी तबला वादनात देखील मला आवड आहे. सुरुवातीला तबल्यावरच मला पुस्तक लिहायचे होते. मात्र विचार बदलला.  ‘क्वॉन्टम मेकॅनिक्स’वर पुस्तक लिहले. १० वी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा विचार असून,बायोलॉजी हा विषय खूप आवडत असल्याचेही ओमप्रकाश म्हणाला.

कुलगुरु होण्याचा विचारभविष्यात मला सहा  विषयांवर पीएच.डी. करायची आहे. याबाबत मी माझ्या आजीला ही माहिती दिल्यावर आजीने मला कुलगुरु बनण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी देखील कुलगुरु बनण्याचा विचार सध्या करत आहे.  खेळात फार आवड नसून, संशोधनात्मक गोष्टींमध्ये अधिक आवड असल्याचे ओमप्रकाशने सांगितले.