आणखी एक कोरोना बाधित रूग्ण, बाधीत महिलेच्या वडिलांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:06 IST2020-05-04T22:06:19+5:302020-05-04T22:06:41+5:30

जळगाव : येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 38 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी ...

Another corona-infected patient, corona to the father of the infected woman | आणखी एक कोरोना बाधित रूग्ण, बाधीत महिलेच्या वडिलांना कोरोना

आणखी एक कोरोना बाधित रूग्ण, बाधीत महिलेच्या वडिलांना कोरोना

जळगाव : येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 38 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 37 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर एक व्यक्तीचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 

पाॅझिटिव्ह आढळलेला 50 वर्षीय पुरूष हा यापूर्वी पाॅझिटिव्ह आढळलेल्या समतानगर, जळगाव  (मुळगाव चिंचोली, ता. बाळापूर, जि. अकोला) येथील महिलेचे वडील आहेत.

निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शेंदूर्णी येथील अकरा व्यक्तींचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 53 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे

Web Title: Another corona-infected patient, corona to the father of the infected woman

टॅग्स :Jalgaonजळगाव