जिल्ह्यात आणखी ७५ कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:29 IST2020-06-20T18:29:15+5:302020-06-20T18:29:25+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना ...

जिल्ह्यात आणखी ७५ कोरोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना दिसून येत आहे़ शनिवारी पुन्हा नवीन ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पारोळा ३७, जळगाव शहर १२, भुसावळ ०९, रावेर ०५, अमळनेर ०४, एरंडोल ०३, धरणगाव, यावल प्रत्येकी ०२, जामनेर ०१ रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २१४९ इतकी झाली आहे.