जळगाव जिल्ह्यात आणखी ६३ कोरोना बाधित, एकूण रुग्णसंख्या १०८३वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:16 IST2020-06-07T17:15:56+5:302020-06-07T17:16:36+5:30
अमळनेर येथील १५ रुग्णांचा समावेश

जळगाव जिल्ह्यात आणखी ६३ कोरोना बाधित, एकूण रुग्णसंख्या १०८३वर
जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून रविवारी आणखी नवीन ६३ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या १०८३वर पोहचली आहे.
रविवारी आढळून आलेल्या ६३ रुग्णांमध्ये अमळनेर येथील १५ रुग्णांचा समावेश असून त्या खालोखाल जळगाव शहरात १२, भुसावळ येथील १० रुग्णांचा समावेश आहे. या सोबतच यावल येथील ८, एरंडोल, रावेर येथील प्रत्येकी ४, जामनेर येथील ३, चाळीसगाव, धरणगाव, येथील प्रत्येकी २ तर चोपडा, बोदवड व दुसऱ्या जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण ६३ नवीन रुग्ण आढळून आले.