जिल्ह्यात आणखी ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 17:55 IST2020-06-04T17:55:08+5:302020-06-04T17:55:21+5:30
जळगाव : दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. बुधवारी ७१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ...

जिल्ह्यात आणखी ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव : दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. बुधवारी ७१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता गुरूवारी सुध्दा तब्बल ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०७, भुसावळ ०७, अमळनेर ०४, भडगाव ०१, यावल ०१, एरंडोल ०२ तसेच जामनेर ०३, जळगाव ग्रामीण ०१, रावेर ०५, पारोळा ०५ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ९०७ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण जळगाव शहरात आढळून आले आहे. २०६ अशी ती संख्या आहे. त्यानंतर भुसावळमध्ये २०५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहेत. अमळनेरमध्ये १४३ आढळलेले आहेत.