आणखी नवीन २२६ कोरोना रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 20:42 IST2020-07-14T20:42:37+5:302020-07-14T20:42:49+5:30
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे दोनशेच्या टप्प्याने सातत्याने वाढत आहे़ मंगळवारी सुध्दा जिल्ह्यात तब्बल २२६ व्यक्तींचे ...

आणखी नवीन २२६ कोरोना रूग्ण आढळले
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे दोनशेच्या टप्प्याने सातत्याने वाढत आहे़ मंगळवारी सुध्दा जिल्ह्यात तब्बल २२६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनाची द्विशतकीय खेळी अजून संपत नसल्याचे चित्र दिसून येत आहे़ तर आतापर्यंत ६ हजार ३९३ इतकी कोरोना बाधितांची संख्या झाली आहे़
विशेष म्हणजे, एका दिवसात २२६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असताना दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे़ अर्थात एका दिवसात १४७ बाधित रूग्ण कोरोनावर मात करीत घरी परतले आहे़
जिल्ह्यात कोरोना विषाणून अक्षरश: थैमान घातले आहे़ त्याला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आठवडाभराचे लॉकडाऊन जाहीर केले होते़ मात्र, त्या काळातही बाधितांची संख्या ही दीडशेच्यावर वरचं आढळून आली़ त्याचबरोबर ज्याप्रमाणे बाधितांची संख्या अधिक होती, त्याचप्रमाणे बरे होणाऱ्या रूग्णांचीही संख्या अधिक असल्याचे उदाहरणेही बघायला मिळाली़ मंगळवारी जिल्हा प्रशासनाला एकूण तपासणीसाठी पाठविलेले ११९७ स्वॅबचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे़ त्यात २२६ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़
कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३४३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे़ त्यात मंगळवारी एका दिवसात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे़ तर २ हजार १६३ कोरोना बाधित व्यक्ती हे कोरोना रूग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे़
अशी आहे कोरोना बाधितांची संख्या
जळगाव शहर ९४, जळगाव ग्रामीण २८, जामनेर २५, चोपडा २४, अमळनेर २१, भुसावळ १०, भडगाव ६, एरंडोल ५, धरणगाव, पारोळा प्रत्येकी ३, पाचोरा, यावल प्रत्येकी २, चाळीसगाव, बोदवड, दुसºया जिल्ह्यातील प्रत्येकी १ असे एकूण २२६ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत़