भाजपच्या शिवसेना कार्यालयासमोर घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST2021-08-25T04:22:11+5:302021-08-25T04:22:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दुपारी शिवसेनेने भाजप कार्यालयावर हल्ला बोल केल्यानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक ...

भाजपच्या शिवसेना कार्यालयासमोर घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुपारी शिवसेनेने भाजप कार्यालयावर हल्ला बोल केल्यानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयावर पायी मोर्चा नेत त्या ठिकाणी नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यासह टॉवर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
भाजप कार्यालयापासून सायंकाळी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात टॉवर चौकात घोषणा दिल्यानंतर भाजपने मोर्चा गोलाणी मार्केटमधील शिवसेना कार्यालयावर वळविला. देशाविरोधात बोलणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसताना केंद्रीय मंत्र्यांना एका वक्तव्यावरून अटक केली जाते, ही घटना लोकशाहीविरोधात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. यावेळी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, वंदना पाटील, दीप्ती चिरमाडे, विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, महेश जोशी, महेश चौधरी, किशोर चौधरी, राजू मराठे, धीरज सोनवणे, पिंटू काळे, अश्विन सोनवणे, केदार शिंदे, परेश जगताप, विजय वानखेडे, अजित राणे, विनोद मराठे, जयेश भावसार, गणेश वाणी, अरूण श्रीखंडे, कुमार श्रीरामे आदी उपस्थित होते.