अंजाळे घाटात बस अपघातात ५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:09 IST2020-02-06T22:09:17+5:302020-02-06T22:09:22+5:30
यावल/ अंजाळे : भुुसावळकडून अंंंजाळेकडे येत असलेल्या एस. बसने ट्रकला मागुन जोरदार धडक दिल्याने बसमधील पाच प्रवाशी गंभीर जखमी ...

अंजाळे घाटात बस अपघातात ५ जखमी
यावल/ अंजाळे : भुुसावळकडून अंंंजाळेकडे येत असलेल्या एस. बसने ट्रकला मागुन जोरदार धडक दिल्याने बसमधील पाच प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंजाळे घाटातील वळणार घडली. जखमींना भुुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.
भुसावळ आगाराची हिंगोणा जाणारी सव्वानऊ वाजेची एस. टी. बस (एम. एच. १४- बि. टी. ०४४२) नवलसिंग वामन हिवरे हे चालवत असताना. अंजाळे घाडाकत ट्रकला (जी. जे.- एक्स ५८६२) मागून जोरदार धडक दिली. यात बसमधील पाच प्रवाशी जखमी झाले. शरद पंढरीनाथ दंडगव्हाळ (६० वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात घाटातील वळणावरच झाल्याले घाटाच्या यावल व भुसावळ या दोन्ही बाजुची वाहतुक खोळंबल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती. धनवडे व सहका-यांनी क्रेनला बोलावून क्रेनच्या सहाय्याने बस बाजुला करून वाहतुक सुरळीत केल्यानंतर सुमारे तीन तासानंतर वाहतुक पुर्ववत सुरळीत झाली आहे.
याप्रकरणी ट्रक चालक मोहम्मद अकील मोहम्मद नसीम (रा. कसरग ता. राणीगंज जि . प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून बसचालक हिवरे यांच्या विरूध्द यावल पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.