शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:15 AM

वडगाव आंबे : ग्रामपंचायतीने ठराव करून पोलिसांना निवेदन दिल्यानंतरही अवैध धंदे बंद होईना

ठळक मुद्देपिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांनी दोन दिवसात सर्व अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्याचे आश्वासन मोबाइलवरून दिले. त्यानंतर महिलांनी दोन दिवसात अवैधधंदे बंद न झाल्यास जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे स्पष्ट केमहिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला व जोपर्यंत अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. यानंतर सरपंच कलाबाई हरिभाऊ पाटील, उपसरपंच मंगेश गायकवाड, सदस्य हर्षल पाटील, मुकेश पाटील, सुनील निकम, ग्रामसेवक किशोर खोडवेग्रामसभेने ठराव करून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक, जळगाव, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव यांना वेळोवेळी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने महिलांना हे पाऊल उचलावे लागले असून, अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सरपंच कलाबाई हरि

आॅनलाईन लोकमतपाचोरा, जि.जळगाव, दि. २३ : तालुक्यातील वडगाव आंबे येथे राजरोसपणे सुरू असलेले दारू, सट्टा, पत्ता असे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे या मागणीसाठी संतप्त महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून हल्लाबोल केला.वडगाव आंबे ग्राम पंचायतीच्या जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामसभेत संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे व ठारावाची प्रत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यातच कारवाई करण्यासाठी देण्यात आली आहे. परंतु कारवाई न झाल्याने ग्रामपंचायतीने एप्रिलमध्ये जळगाव येथे पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक यांनाही पत्र देऊन कारवाई करण्यासाठी विनंती केली. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ग्रामसभेने अवैध धंदे बंद करण्याचा ठराव करून व संबंधितांना लेखी देऊनही कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या महिलांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्याची व व्यसनाधिनतेने अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची वाट पाहू नये अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त महिलांनी यावेळी दिला.ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच, उपसरपंच, सदस्य आले. त्यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले. गावात महिला पोलीस पाटील रेखा वाघ असल्यावरही त्या न येता त्यांच्याऐवजी त्यांचे पती आल्याने महिलावर्गाने नाराजी व्यक्त केली. या ठिय्या आंदोलनात रंजनाबाई पाटील, शांताबाई सूर्यवंशी, गीताबाई पाटील, सिंधूबाई हडप, केदाबाई हटकर, सुरेखा जैन, सुनबाई मराठे यांच्यासह अनेक महिला व पुरुष सहभागी झाले. या वेळी उपसरपंच अ‍ॅड.मगेश गायकवाड, पीतांबर सपकाळे व महिलांनी पोलीस प्रशासनावर आरोप केला. 

टॅग्स :agitationआंदोलनPachoraपाचोरा