शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यात आणल्याचा मनात राग, पोलिसाला मारहाण करून केला चॉपरने वार

By सागर दुबे | Updated: March 29, 2023 20:03 IST

चौघांविरूध्द गुन्हा ; तीन जणांना अटक

जळगाव : काही दिवसांपूर्वी भजे गल्लीमध्ये दारू पिवून वाद घालणा-या तरूणांना जिल्हापेठ पोलिसांनीपोलिस ठाण्यात नेले होते. याचा राग मनात ठेवून त्या तरूणांनी मित्रांसोबत जेवण्यासाठी हॉटेलात आलेल्या गणेश मधूकर पाटील (३८) या पोलिसाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना हॉटेल रिगल पॅलेसमध्ये मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एक संशयित अद्याप फरार आहे.

पोलिस गणेश पाटील हे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते मंगळवारी रात्री त्यांचे मित्र मयूर गवळी व सिताराम पुरोहीत यांच्यासोबत जेवणासाठी हॉटेल रिगल येथे गेले होते.  समोरील टेबलावर बसलेले दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी दादा तुम्ही आम्हाला ओळखल का? असे विचारले. गणेश पाटील यांनी त्यांना मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगितले. त्यानंतर त्यातील एकाने आम्ही भजे गल्लीतील हॉटेलमध्ये दारु पिवून वाद घातला होता. तुम्ही पोलीस गाडी घेवून आले होते. आणि आम्हाला पोलीस ठाण्यात घेवून गेले होते, असे त्यांनी सांगितल्यावर पाटील यांनी त्यांना ओळखले. काही वेळानंतर त्या तरुणांनी पाटील यांच्या शेजारच्या टेबलावर बसलेल्या समाधान बारी व परवेज शेख यांना पाण्याची बाटली मारुन फेकली. बारी यांनी त्यांना जाब विचारला असता त्या चौघांनी त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली.खिशातून फायटर काढून केला वारदरम्यान, चौघे तरुण वाद घालत असल्याने गणेश पाटील हे त्यांना समजावित असतांना त्यांनी तु कोण रे तुझा काय संबंध आहे येथे, तु यापुर्वी मला पोलीस स्टेशनला घेवून गेला होता. तेव्हा पासून तु माझ्या डोक्यात बसला आहे. आता तु चांगलाच सापडला आहे, आता माझे मित्र सुद्धा आहेत, तु काही करु शकणार नाही, असे म्हणत वाद घालणार्‍या तरुणांपैकी एकाने खिशातून फायटर काढून गणेश पाटील यांच्या चेहर्‍यावर मारुन त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी त्यांना खाली पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले.चौघांविरूध्द गुन्हासोबत असलेल्या लोकांनी गणेश पाटील यांची मारहाण करणार्‍यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिल्यानंतर लागलीच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी संशयित कृष्णा नरेंद्र पिंगळे (२०, रा. रायसोनी नगर जिजाऊ चौक), मयंक राजेंद्र चौधरी (२७, रा. गणेशवाडी), भावेश अनिल चौधरी (१९, रा. गणेश वाडी) यांना अटक केली तर त्यांच्यासोबत असलेला गोपाल नवल हा तेथून पसार झाला. याप्रकरणी चौघांविरुद्ध पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव