पैसे मागितल्याचा राग व्यापाऱ्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST2021-07-04T04:13:17+5:302021-07-04T04:13:17+5:30
निंभोरा बुद्रूक, ता. रावेर : कापसाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने व्यापाऱ्याने आपणास मारहाण केल्याची तक्रार शेतकऱ्याने पोलिसांकडे केली आहे. ...

पैसे मागितल्याचा राग व्यापाऱ्याकडून मारहाण
निंभोरा बुद्रूक, ता. रावेर : कापसाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने व्यापाऱ्याने आपणास मारहाण केल्याची तक्रार शेतकऱ्याने पोलिसांकडे केली आहे.
खिर्डी बुद्रूक येथील शेतकरी केतन शांताराम भंगाळे यांचे व्यापारी ईस्राईल सुलेमान पिंजारी यांच्याकडे असलेल्या कापसाचे वर्षभरापासून पैशांची मागणी केली, मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून व्यापारी इस्त्राईल पिंजारी टाळाटाळ करीत असून त्याच्याकडे या तरुण शेतकऱ्यांनी पैशांची मागणी केली असता व्यापाऱ्यासोबत असलेल्या इस्माईल सुलेमान पिंजारी याने केतन शांताराम भंगाळे या शेतकऱ्यास मारहाण केली. त्या संदर्भातील तक्रार केतन भंगाळे यांनी निंभोरा पोलिसांत केतन भंगाळे यांनी तक्रार दाखल केल्यावर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सदर व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात भेट दिली. यासंबंधी रविवारी अनेक शेतकरी तक्रार देणार असल्याचे समजते.
दरम्यान, खुद्द व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल खरेदी करीत फसवणूक करीत पैसे देण्यास टाळाटाळ करून वर दमदाटी व शेतकऱ्यास मारहाण केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर संशयित आरोपीस अटक करून निंभोरा पोलिसांत आणण्यात आले होते. याबाबत तपास सपोनि स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश शिंदे व एएसआय अन्वर तडवी करीत आहेत.