शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

आईला हिणवल्याचा संताप, तलवारीने वार करून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST

रावेर : शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला घोडा म्हणून हिणवल्याचा राग आल्याने, संतापात एकाने थेट तलवारीने डोक्यावर वार करून, ...

रावेर : शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला घोडा म्हणून हिणवल्याचा राग आल्याने, संतापात एकाने थेट तलवारीने डोक्यावर वार करून, सोमवारी रात्री जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आज जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना, त्या जखमी इसमाचा मृत्यू झाला असून, एकच खळबळ उडाली आहे. रावेर पोलिसात संबंधित आरोपींवरील जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ करण्यात येणार असून, रावेर न्यायालयाने सदर आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील संभाजीनगर भागात वास्तव्यास असलेले भाजीपाला विक्रेते राजू देवराम चौधरी (५५) हा आपल्या आईला घोडा बोलून हिणवत असल्याचा राग आल्याने, आरोपी रवींद्र संतोष मराठे याने थेट प्राणघातक तलवारीने राजू देवराम चौधरी यांच्या डोक्यात वार करत, गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सोमवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास जखमी राजू देवराम चौधरी यांच्या घरासमोर घडली होती. रक्तबंबाळ झालेल्या जखमी राजू देवराम चौधरी यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करून, जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, जळगाव येथील मेंदूवर शस्त्रक्रिया करून औषधोपचार सुरू असताना, जखमी राजू देवराम चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खबर आज दुपारी ४ वाजता समजल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मयताचा भाऊ गणेश देवराम चौधरी रा.संभाजीनगर यांनी सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

सदर आरोपी रवींद्र संतोष मराठे यास रावेर पोलीसांनी मंगळवारी पहाटे तीन वाजता अटक करून रावेर न्यायालयासमोर हजर केले होते. न्या.आर.एल. राठोड यांनी सदर आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनास्थळी फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे, मनोहर जाधव, अनीस शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. खुनाच्या बातमीने शहरात एकच खळबळ उडाली असून, संभाजीनगर भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.