अन‌् डाॅक्टर भडकले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:19+5:302021-06-28T04:13:19+5:30

---- जाऊ द्या राव... आणखी गुन्हा दाखल होईल..! दोन दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाचे मोठे आंदोलन होते. पक्षाच्या गल्लीबोळातील कार्यकर्त्यांना ...

And the doctor got angry ...! | अन‌् डाॅक्टर भडकले...!

अन‌् डाॅक्टर भडकले...!

----

जाऊ द्या राव... आणखी गुन्हा दाखल होईल..!

दोन दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाचे मोठे आंदोलन होते. पक्षाच्या गल्लीबोळातील कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या वेळी हजर राहण्याचे फर्मान निघाले... एका ठिकाणी पक्षातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला निमंत्रण होते... तो निरोप असा होता की.. या भागात नेतृत्व तुम्ही करायचे.. कार्यकर्ते गोळा करून त्यांना मार्गदर्शन करायचे... त्यानुसार या कार्यकर्त्याला निरोप मिळाला... त्याने तयारीही सुरू केली... पण अचानक माशी शिंकली... या कार्यकर्त्याला निरोप मिळाला की अरे... अगोदरच काही गुन्हे दाखल आहेत. या आंदोलनात सहभाग घेतला तर म्हणे पोलीस अटक करणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याचा का होईना... पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यकर्ता काहीसा घाबरला... त्याने अचानक आजारपण काढले.. तब्बेत ठीक नाही.. शिंका येत आहेत... अंग जड झाले... आहे... दुखते आहे.. असा निरोप काढून आंदोलनातून काढता पाय घेतला... आंदोलन झाले पण... कार्यकर्त्याच्या मानसिकतेची जोरदार चर्चा सुरू होती....

Web Title: And the doctor got angry ...!