धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी पुरूषाचा मृत्यू
By सागर दुबे | Updated: April 14, 2023 15:05 IST2023-04-14T15:04:56+5:302023-04-14T15:05:05+5:30
अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून नातेवाईकांना ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी पुरूषाचा मृत्यू
जळगाव : धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी पुरूषाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास म्हसावद ते बोरनार रेल्वे लाईनवर घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून नातेवाईकांना ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शुक्रवारी सकाळी म्हसावद ते बोरनार अप रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक ३९५/२४-२२ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून एका अनोळखी पुरूषाचा मृत्यू झाला. ही घटना स्टेशन प्रबंधकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
मृतदेहाची अंगझडती घेतली, मात्र ओळख पटेल असे काहीही मिळून आलेले नाही. अखेर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.