आॅनलाईन लोकमतनेरी, ता.जामनेर,दि.२३ : जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत आयोजित अमृत महामॅरेथॉनमध्ये तालुक्याभरातील ७०० विद्यार्थ्यांसह अधिकारी व पदाधिकाºयांनी सहभाग घेतला. सात किलोमीटरच्या महामॅरेथॉन मध्ये अमोल खैरे हा विजेता ठरला.स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जामनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदा पिठोडे, सातपुडा आॅटोमोबाईल्सचे किरण बच्छाव, जामनेरचे तहसीलदार नामदेव टिळेकर, नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, प्रशांत देशमुख, विवेक पाटील, विक्रांत सराफ यांच्या उपस्थितीत झाला.शनिवारी सकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरवात झाली. तालुक्याभरातील २५ विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉनमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तहसीलदार नामदेव टिळेकर, नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे, किरण बच्छाव, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक जण धावपट्टीवर उतरले होते.
नेरीच्या महामॅरेथॉन स्पर्धेत अमोल खैरे ठरला विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 17:07 IST
जामनेर तालुक्यातील २५ शाळांमधील ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग
नेरीच्या महामॅरेथॉन स्पर्धेत अमोल खैरे ठरला विजेता
ठळक मुद्देजामनेर तालुक्यातील २५ विद्यालयांचा सहभाग७०० विद्यार्थ्यांसह अधिकारी व पदाधिकाºयांचा सहभागराणीदानजी जैन विद्यालयाचा अमोल खैरे ठरला विजेता