रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडून रुग्णाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांकडून गाडीची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:53 IST2020-08-26T22:53:45+5:302020-08-26T22:53:50+5:30
चालकाला मारहाण

रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडून रुग्णाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांकडून गाडीची तोडफोड
कुरंगी : रुग्णाला जळगाव येथे घेऊन जात असताना रस्त्यातच सामनेरच्या पुढे रुग्णवाहिका बंद पडल्याने त्या गाडीत असलेल्या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांनी संतप्त होऊन रुग्णवाहिकेची तोडफोड केल्याची घटना २६ रोजी सकाळी घडली.
याबाबत वृत्त असे की, कुऱ्हाड तालुका पाचोरा येथील रुग्ण दामू श्रावण पवार (६०) हे पाचोरा येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना जळगावला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर पाचोरा येथून जळगाव घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला (एमएच ०५ /आर ०६६१) फोनवरून बोलविले. रुग्णास जळगाव कडेनेत असताना ही घटना घडली.