अमळनेरात तीन बंद घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 18:55 IST2020-11-16T18:54:12+5:302020-11-16T18:55:30+5:30

चोरट्यांनी तीन घरे फोडली.

Amalnerat three | अमळनेरात तीन बंद घरे फोडली

अमळनेरात तीन बंद घरे फोडली


अमळनेर, जि.जळगाव :  दिवाळीत बंद घरे पाहून घराची कडी कापून अज्ञात चोरट्याने रोख  रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाखाचा ऐवज लंपास करून दिवाळी साजरी  केल्याची घटना १५ रोजी मध्यरात्री  ढेकू रोडवर गणेश बंगलोजमध्ये घडली. यासोबत चोरट्यानी इतर दोन घरेही फोडली, मात्र तेथून किरकोळ चोरी केली आहे.

       उदिलाल उत्तम संदानशिव हे १३ रोजी शहरातीलच पैलाड येथील आपल्या सासऱ्यांकडे गेलेले होते. १५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी कापून घरातील  ४० हजार रुपये रोख, ४० हजाराची १० ग्राम सोन्याची साखळी, ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले दागिने चोरून नेले. घरातील कपाटे त्यातील कपडे विसकटून सर्व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.
तसेच याच परिसरात चोरट्याने दोन घरांचे कुलूप तोडले. एका घरातून किरकोळ चांदीचे दागिने, तर दुसऱ्या घरात चोरी न करता चोर फरार झाले आहेत. दिवाळीच्या काळात बंद घरे पाहून चोरटे  संधी साधत असल्याने नागरिकांनी घरात व बाहेर लाईट लावून तसेच पोलिसांना कळवून  बाहेरगावी जावे, असे आवाहन पोलिसांतर्फे  करण्यात आले आहे.

Web Title: Amalnerat three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.