अमळनेरात पुन्हा पाच दिवसांपासून लस नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 23:41 IST2021-06-03T23:41:16+5:302021-06-03T23:41:52+5:30

अमळनेर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण नाही आणि  पाच दिवसांपासून लसीकरण मोहिमेस पुन्हा ब्रेक लागला आहे.

Amalnera has not had a vaccine for five days | अमळनेरात पुन्हा पाच दिवसांपासून लस नाही

अमळनेरात पुन्हा पाच दिवसांपासून लस नाही

ठळक मुद्देआज फक्त फ्रंटवर्कराना मिळणार लस, सामान्य नागरिक प्रतीक्षेतच !

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण नाही आणि  पाच दिवसांपासून लसीकरण मोहिमेस पुन्हा ब्रेक लागला असून शहरात आज ग्रामीण रुग्णालयात केवळ फ्रंटवर्कर यांना लस दिली जाणार आहे,सामान्य नागरिकांची प्रतीक्षा मात्र कायम राहणार आहे.

याआधी दि. २९ मे रोजी कोविशिल्ड लसीचे २०० डोस उपलब्ध झाले होते. त्यानंतर दररोज लस उपलब्ध नसल्याचे संदेश दिले जात असल्याने लसीकरण राहिलेले नागरिकांत नाराजीचा सूर आहे. सद्य:स्थितीत केवळ ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सामान्य नागरिकांना लसी दिल्या जात असून याशिवाय ४५पेक्षा कमी वय असलेल्या केवळ फ्रंटलाईन गटातील नागरिकांना लस दिली जात आहे. ४५वरील अनेक नागरिकांचे लसीकरण  शिल्लक असल्याने दररोज ते लसीकरण केंद्रावर फेऱ्या मारत आहे.

लसीकरणास वेग येण्यासाठी यात सातत्य असावे. तसेच समाजातील प्रत्येक वयोगटाला लस मिळायला हवी, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

कोव्हॅक्सिन लसीचाही तुटवडा

कोविशिल्ड लसीच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीची उपलब्धता अतिशय कमी असून ज्यांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल, त्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस मिळेल की नाही, अशी भीती वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत लोक आता कोविशिल्ड  लसीचाच आग्रह करताना दिसून येत आहे. मात्र किमान ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल त्यांना दुसरा डोस वेळेवर मिळेल, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Amalnera has not had a vaccine for five days