अमळनेरात सामाजिक जाणिवेतून झाली स्वच्छतेची धुळवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 14:11 IST2021-03-29T14:10:48+5:302021-03-29T14:11:05+5:30
संजय पाटील अमळनेर : शहरातील बहादरपूर रोडवरील माळी वाडा भागातील नागरिकांनी पारंपरिक होळीला तिलांजली देत सोमवारी सकाळी सार्वजनिक शौचालयाची ...

अमळनेरात सामाजिक जाणिवेतून झाली स्वच्छतेची धुळवड
संजय पाटील
अमळनेर : शहरातील बहादरपूर रोडवरील माळी वाडा भागातील नागरिकांनी पारंपरिक होळीला तिलांजली देत सोमवारी सकाळी सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करीत सामाजिक जाणिवेतून स्वच्छतेची धुळवड केली. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
माळी वाडा परिसरातील महिलांसाठी सार्वजनिक संडास ही एक सीमा वादात अडकलेली वास्तू आहे. प्रभाग १६ व प्रभाग १७ मधील महिलांसाठी त्यांचा वापर होतो. पण येथे नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. नगरपालिकेकडून येणारे सफाई कर्मचारी हे सार्वजनिक शौचालय आमच्या प्रभागात नाही म्हणून स्वच्छतेची जवाबदारी झटकून मोकळे होतात. दोन्ही प्रभागातील नगरसेवकांना नागरिकांनी वारंवार सांगूनही स्वच्छता होत नाही. अशा परिस्थितीत माळी वाडा परिसरातील नागरिकांनी स्वच्छतेची धुळवड केली.
या सार्वजनिक संडासचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. रवींद्र ओंकार महाजन, मनोहर महाजन, पांडुरंग महाजन, आबा सुपडू महाजन, आबा नामदेव माळी, राहुल (भुऱ्या) महाजन, डिंगबर महाजन, धनराज महाजन, किरण महाजन, राज महाजन, स्वामी महाजन व परिसरातील नागरिकांनी श्रमदानाची धुळवड करून स्वच्छता केली.