अमळनेर पालिकेचे दोन मुकादम निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:24 IST2018-08-21T22:23:57+5:302018-08-21T22:24:25+5:30
पोलीस ठाण्यात अटक झालेली असतानाही माहिती लपविली

अमळनेर पालिकेचे दोन मुकादम निलंबित
अमळनेर, जि.जळगाव : सफाई कामगारांना पोलीस ठाण्यात अटक झालेली असतानादेखील त्यांची माहिती लपवून गैरहजर असल्याचा अहवाल सादर केल्याने मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या दोन मुकादमांना निलंबित केले आहे.
प्रभाग ४ मधील राजेंद्र आधार गढरे या गटार सफाई कामगाराला १० रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अटक झाली आहे, मात्र मुकादम भाऊसाहेब नामदेव पाटील यांनी वरिष्ठांपासून ही माहिती लपवून ठेवली आणि त्याला गैरहजर म्हणून त्याचा खाडा करून तसा अहवाल सादर केला. त्याचप्रमाणे प्रभाग ४ व ११ मधील गटार सफाई कामगार दीपक नामदेव गढरे यालादेखील अमळनेर पोलीस ठाण्यात अटक झाली असताना मुकादम सोमनाथ आत्माराम संदनशिव यांनीही वरिष्ठांपासून ही माहिती लपवून त्यालाही गैरहजर दाखवून त्याचा खाडा केल्याचा अहवाल दिला म्हणून दोन्ही मुकादमनी शिस्तभंग केला. म्हणून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी न.प. अधिनियम १९६५ च्या कलम ७९ अन्वये २१ आॅगस्टपासून भाऊसाहेब पाटील व सोमनाथ संदानशिव यांना पालिका सेवेतून निलंबित केले आहे व सेवा पुस्तकात नोंद घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.