अमळनेर बाजार समितीतर्फे उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:24 IST2019-09-15T23:24:41+5:302019-09-15T23:24:46+5:30

अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणा-या ८५ शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ...

Amalner Market Committee honors outstanding farmers | अमळनेर बाजार समितीतर्फे उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव

अमळनेर बाजार समितीतर्फे उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव



अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणा-या ८५ शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पणन व सहकार विभागाचे ब्रँड अम्बेसेडर गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मारवडचे आधार साळुंखे, शिवाजीराव पाटील, अमलगावचे तुषार पाटील, सारबेटेचे जयेश पाटील, मंगरुळचे दीपक बागुल, पाडळसरेचे पंडित पाटील, कळमसरेचे योगेंद्रसिंग पाटील, रमेश चौधरी व भिकेसिंग जतनसिंग गिरासे, निम येथील मधुकर चौधरी, शिवाजी पाटील आदींचा समावेश होता.
यावेळी उदय वाघ, सभापती प्रफुल पाटील, प्रभारी पराग पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पं.स.सभापती वजाताई भिल, श्याम आहिरे, संगीता भिल, रामभाऊ संदनशिव, विनोद लांबोळे, रूपंचांद महाराज, जि.प.सदस्य मीनाताई पाटील, पं.स.सदस्य रेखाताई पाटील उपस्थित होत्या. प्रास्ताविक विक्रांत पाटील यांनी केले.

 

Web Title: Amalner Market Committee honors outstanding farmers