अमळनेर कृउबामध्ये ज्वारी १७०० तर मका १४२५ रुपये क्विंटल दराने खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 18:05 IST2017-11-15T15:56:15+5:302017-11-15T18:05:49+5:30
शासकीय ज्वारी-मका खरेदी केंद्राचा सभापती उदय वाघ यांच्या हस्ते शुभारंभ

अमळनेर कृउबामध्ये ज्वारी १७०० तर मका १४२५ रुपये क्विंटल दराने खरेदी
आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.१५ - सहकारी संस्था शेतकºयांचा आत्मा आहे. शेतकºयांशी सकारात्मक वागा असे आवाहन अमळनेर कृउबा सभापती उदय वाघ यांनी बुधवारी शासकीय ज्वारी-मका केंद्र शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी ज्वारीला १७०० रुपये तर मक्याला १४२५ रुपये प्रतीक्विंटलसाठी भाव देण्यात आला.
अमळनेर येथील शेतकी संघ जीन मध्ये शासकीय भरड खरेदी केंद्र १५ पासून सुरू करण्यात आले. सभापती उदय वाघ, उपसभापती अनिल अंबर पाटील यांच्या हस्ते ज्वारी खरेदी शुभारंभ करण्यात आला.
सभापती वाघ यांच्या हस्ते पहिल्यांदा धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकºयाचा टोपी रुमाल देऊन सत्कार करण्यात आला. ज्वारीला १७०० रुपये तर मक्याला १४२५ रुपये शासकीय भाव आहे. आतापर्यंत ९४१ क्विंटल मूग व २०१.५ क्विंटल उडीद केंद्रावर खरेदी झाला. शेतकºयांना एकूण ३४ लाख रुपये मालाचा मोबदला देण्यात आला आहे. शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, अनिल शिसोदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, निवासी नायब तहसीलदार कमलाकर जोशी, नायब तहसीलदार प्रशांत वाघ, कृ उ बा संचालक भिकेश पाटील, भगवान कोळी, विक्रांत पाटील, यज्ञेश्वर पाटील, विवेक पाटील, मंगलगिर गोसावी, सुनील शिसोदे , बाबू साळुंखे , ग्रेडर सुभाष पाटील , भटु पाटील उपस्थित होते.