अमळनेरला डी. फार्मसी महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 15:26 IST2020-01-12T15:26:27+5:302020-01-12T15:26:43+5:30

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व कॉलेज आॅफ फार्मसी यांच्यातर्फे स्नेहसंमेलन घेण्यात आले.

To Amalner, d. Honored students of Pharmacy College | अमळनेरला डी. फार्मसी महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी सन्मानित

अमळनेरला डी. फार्मसी महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी सन्मानित

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व कॉलेज आॅफ फार्मसी यांच्यातर्फे स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्यात महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना कल्याण येथील डॉ.राखी जाधव, जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
अंतिम वर्ष डी.फार्मसीत प्रथम येणाऱ्या श्वेता कलानी हिला स्व.मधुसूदन सूरजमल मुंदडे स्मृती पुरस्कार मिळाला. द्वितीय सायमा शेख हिला स्व.किरण रवींद्र बोरसे स्मृती पुरस्कार मिळाला. तृतीय हर्षदा जैन हिला स्व.अमरलाल पंजलमल अंदानी स्मृती पुरस्कार मिळाला.
तसेच प्रथम वर्ष डी.फार्मसीत पहिला आलेला विद्यार्थी लोकेश दीपक पाटील यास स्व.डॉ.शिवकुमार जोशी स्मृती पुरस्कार मिळाला. द्वितीय आलेला गौरव मंधान यास अण्णासाहेब शिवाजीराव पाटील पुरस्कार मिळाला. तृतीय आलेला मयूर हिंदुजा यास जितेंद्र मोहनलाल जैन पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, कार्योपाध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, फार्मसी कॉलेजचे चेअरमन जितेंद्र जैन, अध्यक्ष अनिल कदम, उपाध्यक्ष माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, सदस्य नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे, हरी भिका वाणी, कल्याण पाटील, डॉ.बी. एस.पाटील, चिटणीस डॉ.अरुण जैन, प्राचार्य डॉ ज्योती राणे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र्र माळी, दोघी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: To Amalner, d. Honored students of Pharmacy College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.