Alumni Gathering at Sawda | सावदा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

सावदा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

सावदा, ता.रावेर : येथे नगरपालिका बहुउद्देशीय हॉलमध्ये श्री आगम हायस्कूल व ना. गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहभेटीचा मेळावा उत्साहात पार पडला. २००६ मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यानी हा मेळावा आयोजित केला होता.
विद्यार्थ्यांनी एकमेकांनशी संपर्क साधून कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली.
प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षक पी.डी.वारके यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून आपण सध्या काय काम करतो, आपल्या कामाचे स्वरूप, कामाचे कार्यक्षेत्र, शाळेविषयी व शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना सुख-दुख, आनंद, समाधान, कृतज्ञता, उपकार अशा काही भावनांनी वातावरण भारावून गेले. एकाच छताखाली एकाच शाळेतील विविध क्षेत्रातील काम करणारे विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान ओसंडून वहात होते. प्रा.नंदू पाटील यांनी कार्यक्रमाची सर्व जबाबदारी सांभाळून सूत्रसंचालन केले.
प्राचार्य सी.सी.सपकाळे, एस.ए.महाजन, नंदू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात व.पू. होले यांनी अतिशय सुंदर खिळवून ठेवणारे आपले विचार प्रगट केले.
कार्यक्रमात ५० विद्यार्थी सहभागी होते. उपस्थित सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती एस.वाय.सरोदे, ए.एम.वाणी, एस.एस.महाजन उपस्थित होते. लोकेश टोके यांनी आभार मानले.

Web Title: Alumni Gathering at Sawda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.